आरोग्य

हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखणारी कारणे

1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर हे वारंवार होत असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. हा आजार तेव्हा होतो जेव्हा कोलेस्टेरॉल पायांच्या नसांमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो.

2) जर आपल्याला थोडे देखील चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्यास आपल्याला उच्च कोलेस्टेरॉलचा सामना करावा लागू शकतो.

3) चालताना छातीत दाब किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काळजी घ्या. हे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एनजाइनाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

4) हवामानात बदल झाल्यास अनेकांचे हात-पाय थंड पडतात, हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येतात. असं जर वारंवार होत असेल तर हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात रक्ताभिसरणाची कमतरता जाणवल्यास किंवा पुरेसे रक्त न मिळाल्यास हात-पाय गार होतात.

5) आपले पाय किंवा घोटे चालल्यानंतर किंवा अचानक सुजले तर ही रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये पाणी साचू लागते. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

17 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

20 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

24 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago