साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते.
जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
साखरेचे सेवन अधिक केल्यास चेहऱ्यावर पुरळ, मुरुमे आणि अकाली वृद्धत्व येते.रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने जळजळ आणि हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.
संशोधनातून असं समजलं आहे की, साखरेचा संबंध रक्तदाबाशी जोडण्यात आला आहे. साखरयुक्त पेयांमधून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त साखरेचा आहार झोपेच्या पद्धतीवर परिणाम करतात. जेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो तेव्हा झोप न येण्याची समस्या निर्माण होते.
साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळत असली तरी ती काही प्रमाणातच असते. यामुळे ऊर्जेची पातळी कमी होते. थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते.
साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. यामुळे अस्वस्थता वाढते.
साखरेमुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. आम्ल तयार होऊन दातांमध्ये पोकळी निर्माण करते किंवा दात खराब होतात.
रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊन मूडवर परिणाम करतो. ज्यामुळे मूड स्विंग होऊन चिडचिडेपणा वाढतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…