आरोग्य

तुमच्या उशीच्या कव्हरवर टॉयलेट सीटपेक्षा १७००० पट जास्त बॅक्टेरिया? ‘ही’ आहे धुण्याची योग्य पद्धत

कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी आणि जंतूंपासून दूर राहण्यासाठी, महिला स्वयंपाक केल्यानंतर स्वच्छता करतात. फरशी व्यवस्थित पुसणं, धूळ साफ करणं, शौचालय स्वच्छ करणं ही कामं करण्यात त्याचा संपूर्ण दिवस जातो. याच कामाच्या नादात बऱ्याच महिलांना वेळेवर चादर किंवा उशीचं कव्हर बदलण्याचं लक्षात राहत नाही.

जोपर्यंत उशीचं कव्हर जास्त घाणेरडं दिसत नाहीत तोपर्यंत महिला ते बदलत नाहीत. हिच एक मोठी चूक ठरत आहे. रिसर्चमधून आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. त्यांचा असा दावा आहे की, ४ आठवडे न धुतलेल्या उशीच्या कव्हरमध्ये टॉयलेट सीटपेक्षा १७ हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात. अशा परिस्थितीत, उशीचं कव्हर कधी बदलायचं आणि धुवायचं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

नॅशनल स्लीप फाउंडेशन या अमेरिकन एनजीओच्या रिपोर्टनुसार, फक्त एका आठवड्यानंतर न धुतलेल्या उशाच्या कव्हरमध्ये प्रति चौरस इंचात सुमारे ३ मिलियन बॅक्टेरिया आढळून आले. जे सरासरी टॉयलेट सीटपेक्षा सुमारे १७,००० पट जास्त बॅक्टेरिया आहेत. म्हणूनच उशांच्या कव्हर व्यतिरिक्त चादर देखील दर काही दिवसांनी धुवावी.

धुण्याची योग्य पद्धत

चादर आणि उशीचं कव्हर धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी जितके गरम पाणी वापरता तितके बॅक्टेरिया आणि जंतू लवकर मरतात. खूप डिटर्जंट वापरू नका. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. याशिवाय धुतल्यानंतर ते इस्त्री करायला विसरू नका.

उशीचं कव्हर आणि चादर कधी बदलावी?

आठवड्यातून किमान एकदा तरी उशीचं कव्हर आणि चादर बदलायला हवी, धुवायला हवी.

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर दर तीन-चार दिवसांनी कव्हर आणि चादर धुवा.

उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे दुर्गंधी देखील येते म्हणून तुमचं कव्हर वारंवार बदला.

अशी ठेवा स्वच्छता

झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल. उशीच कव्हर आणि चादर खराब होणार नाहीत.

जिममधून आल्यानंतर बेडवर झोपण्याची किंवा बसण्याची चूक करू नका.

झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाका.

बेडवर खाणे-पिणे टाळा आणि पाळीव प्राण्यांना बेडजवळ येऊ देऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

10 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

14 तास ago