आरोग्य

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक

मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणीः 

मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो. बाजारात मुलतानी मिट्टी अगदी आरामात उपलब्ध होईल. आणि त्यात हा फेसपॅक बनवायला वेळही लागत नाही.

टॉमेटो, लिंबू आणि मधः

एका वाटीत टॉमेटोचा बल्क घ्या, त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. टॉमेटो आणि लिंबू तुमची त्वचा उजळवायला मदत करेल तर मध तुमच्या चेहऱ्यावर तजेला आणेल.

लिंबू आणि दुधः

एका वाटीत तीन चमचे दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन छोटे चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेह‍ऱ्यावरचा तेलकटपणा जाईल.

संत्रा-लिंबू आणि मध‍ः

संत्र्याच्या सुकलेल्या सालींची मिक्सरला लावून पावडर बनवा; त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. त्याची ढवळून जाडसर पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. जवळपास वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा नीट धुवा. हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच उत्तम परिणाम देईल.

काकडी आणि लिंबूः

काकडीमुळे त्वचा तर उजळतेच. पण तुमच्या त्वचेवरचा टॅन घालवायलाही मदत करेल. काकडीचा एक चमचा रस एका वाटीत घ्या. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा हळद घाला. या मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण डोळ्यांभोवती आवर्जून लावा कारण त्यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ कमी होतात. पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही रोज वापरल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago