आरोग्य

काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल

बदामाला ड्राय फ्रूटचा राजा म्हटलं जातं. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. नियमितपणे बदाम खाल्ल्याने शरीराला मोठी एनर्जी मिळते. तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. अनेक लोक रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खातात आणि यावेळी बदामाची साल काढून फेकतात. पण ही एक मोठी चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सगळ्यांनीच बदामाची साल काढू फेकू नये. साल काढल्याने बदामाची ताकद अर्धी होते. काही लोकांसाठी बदामाची साल फायदेशीर ठरते. पण सगळ्यांनी असं करू नये. बदाम भिजवून खावेत की साल काढून खावेत हे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. पण समस्या ही आहे की, जास्तीत जास्त लोकांना बदाम खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही.

बदामाच्या सालीचे फायदे 

बदामाच्या सालमध्ये हाय डायटरी फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल असतात. एक्सपर्टनुसार, बदामात फ्लेवेनॉइड असतात जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. याने ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत मिळते.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदामाच्या सालीमध्ये फायटिक अ‍ॅसिड असतं. जे आयर्न, झिंक, कॅल्शिअमसारखे मिनरल्समध्ये जुळून त्यांचे फायदे मिळू त्यांचे फायदे मिळू देत नाही. मात्र, बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने फायटिक अ‍ॅसिड निष्क्रिय होतं. त्यानंतर तुम्ही सालीसह बदाम खाऊ शकता.

बदामाची साल काढून टाकल्याने त्यातील फायबर कमी होतं. सोबतच अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फ्लेवोनॉइड आणि फेनोलिक अ‍ॅसिडही कमी होतं. बदामाची साल काढणं अशा लोकांसाठी फायदेशीर ठरतं ज्यांना लो फायबर डाएट घ्यायची आहे किंवा जे कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम इत्यादीसाठी केवळ प्लांट बेस्ड डाएटवर अवलंबून आहेत.

भिजवल्याने लवकर पचतात बदाम

जर तुम्हाला बदाम पचवण्यास समस्या होते किंवा तुमचं डायजेशन स्लो असेल तर बदाम भिजवून खावेत. असं केल्याने याचं टेक्स्चर मुलायम होतं आणि सहजपणे पचतात.

बदाम खाण्याची योग्य पद्धत

जर जास्त फायबर घेतल्याने समस्या, डायजेशन स्लो किंवा सालीने घशात समस्या होत असेल तर बदाम भिजवून साल काढून टाका. नाही तर बदाम भिजवून सालीसोबतच खाऊ शकता. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी सालीसोबत खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

57 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

59 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago