आरोग्य

थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय खाण टाळाल

हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान

हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे.

कोणत्या आजारांचा असतो धोका

थंडीच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सीजनल फ्लू, सर्दी, खोकला, घशात खवखव, वायरल ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय पोट, लिव्हर, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टमसोबत कफ आणि घशातही समस्या होते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच अपचन आणि डायरियाची देखील समस्या होऊ शकते.

कशी घ्याल काळजी

थंडीच्या दिवसात बाहेर काही खाण्याऐवजी आवडीनुसार घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता. घरीच तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी सूजचं सेवन करू शकता. घरीच बनवलेले गरमागरम आणि ताजी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या दिवसात जास्तीत जास्त लोक घरातच जास्त वेळ राहत असल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago