शिरूर (अरुणकुमार मोटे): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन यंदा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठन येथे विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि क्रीडागणात जोशाचे वातावरण पाहायला मिळाले.
या निमित्ताने कबड्डी, खो-खो तसेच क्रीडांगण मापनाशी संबंधित प्रश्नमंजुषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
क्रीडाशिक्षिका राणी घावटे -कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. “खेळांमुळे शारीरिक व मानसिक संतुलन साधले जाते. त्यातून संघभावना, आत्मविश्वास, जिद्द, खेळाडूवृत्ती तसेच यश-अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होते” असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले , तसेच संतोष दंडवते , कृष्णा मगर, मीना थोरात , रत्नमाला महाजन, कुणाल दंडवते आदी शिक्षक उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये मुलांनी सहभाग घेताना एकमेकांना प्रोत्साहन दिले. आनंद, उत्साह, शिस्त आणि खेळाडूवृत्तीने त्यांनी हा दिवस संस्मरणीय केला.शाळेचे मुख्याध्यापक मिडगुले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून सांगितले की, “खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात किमान एक खेळ आत्मसात करावा.”राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून गेला आणि क्रीडेमधील त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट करून गेला.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…