आरोग्य

मणका दुखण्याची कारणे व उपाय

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय…

सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता अशते. डिस्क (मणक्यामधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्कमधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत नाही. त्याला डिस्क डिजनरेट होणे असे म्हणतात. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि पाठदुखी सुरू होते.

मणका आणि पाठीच्या समस्यांची कारणे…

व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पाठीत बाक काढून चालायची आणि बसायची सवय यामुळे मागच्या बाजूच्या सांध्यांवर ताण येतो. अनेकदा टूव्हीलर किंवा चारचाकी चालवताना धक्के बसतात. बरेच दिवस हे दुखणे अंगावर काढले तर ही समस्या वाढत जाते आणि भविष्यता त्याचे विपरीत परीणाम दिसायला लागतात.

शरीराची पोझिशन ताठ हवी, मानही ताठ असायला हवी. मोबाइलचा अतिवापर केल्याने टेक्स नेक सिंड्राोम होऊ शकतो. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर टाळायला हवा. दिवसातून किमान वेळ काढून काही ना काही व्यायाम नियमितपणे करायला हवा. दुचाकी किंवा चारचाकी चालविताना स्पीड ब्रेकरमुळे मणक्याला धक्के बसतात त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

कोणती काळजी घ्यायला हवी

1) बसताना चुकीच्या पद्धतीने बसू नये…

बरेचदा कामाच्या नादात आपण तिरके, वाकडे बसतो. मात्र त्याने नंतर पाठ अवडते.

2) खाली वाकून काही उचलताना…

वाकून चुकीच्या पद्धतीने जोर लावला तर पाठ दुखते.

३) लॅपटॉप किंवा टेबल आणि खुर्चीची पोझिशन…

योग्य असेल तर ही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे आपली बसायची पद्धत योग्य आहे की नाही हे तपासावे.

4) अनेकदा चालताना पाय दुखतात…

बॅक स्ट्रेन झाला असेल, सांध्यांना इजा झाली तर वळताना मान दुखते. खांद्याच्या वरचा भाग दुखतो, मुंग्या येतात. त्यामुळे नियमीतपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago