आरोग्य

झोप शांत लागण्यासाठी करा हे घरगुती उपाय

१) झोपायला जाण्याच्या ३० मिनिटं आधी स्क्रीन पाहणं टाळा

अनेकांना झोपताना हातात फोन घेऊन तासनतास वापरण्याची सवय असते. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि डोळेसुद्धा कमकुवत होऊ शकतात. झोपायला जाण्याच्या ३० मिनिटं आधी स्क्रीनचा वापर टाळा. ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट, व्यवस्थित दिसेल.

२) झोपण्याची एक आरामदायक दिनचर्या बनवा

स्लिप फाऊंडेशन ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार झोपण्याचे एक रूटीन बनवा. झोपण्याच्या आधी जड जेवण आणि अल्कोहोलयुक्त पेय, एसिड रिफ्लेक्सयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. ज्यामुळे तुमची झोप होऊ शकते. शास्त्रज्ञांच्यामते अंघोळीच्या एक तास आधी कोमट पाण्यानं अंघोळ करा. संगीत एक रिलॅक्सेशन टूल आहे. झोपताना तुम्ही शांत संगीत ऐकू शकता. ज्यामुळे डोक्याला विश्रांती मिळेल आणि चिंतापासून दूर राहाल.

३) खोलीचे तापमान आणि वातावरण

तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथे शांतता असेल असं पाहा. कारण जास्त आवाजाच्या ठिकाणी तुम्हाला झोपच येणार नाही. रूममध्ये गारवा असू द्या. एसी, पंखा ऑन करून नंतर काही वेळानं झोपायला जा. एसी नसल्यास खिडक्या थोड्यावेळासाठी उघड्या ठेवा जेणेकरून रूम गार राहील.

४) दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर कॅफेन कमी प्रमाणात घ्या

तुम्ही जास्त प्रमाणात चहा प्यायलात तर तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणून कमीत कमी प्रमाणात कॅफेनचे सेवन करा. तुम्ही जास्त प्रमाणात चहा कॉफी घेतलात तर रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. सकाळी एकदा चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत चहा किंवा कॉफी घ्या. जास्त उशीरा चहा, कॉफी घेतल्यानं लवकर झोप लागणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

10 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

10 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

10 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

10 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

12 तास ago