आरोग्य

शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरील उपाय

शीतपित्ताचा त्रास होण्यामागची कारण

१) शीतपित्ताचा त्रास होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, असा एखादा पदार्थ तुमच्या खाण्यात येणे किंवा मग तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात येणे. शीतपित्ताचा त्रास होण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण आहे.

२) दुसरं कारण म्हणजे एखादा किडा चावल्याने किंवा सल्फा औषधांच्या संपर्कात आल्यानेही पित्ताचा त्रास होतो.

३) तीव्र सुर्यप्रकाशात जाणे, खूप उष्ण पदार्थ खाणे यामुळेही काही जणांना शीतपित्ताचा त्रास होऊ शकतो.

४) धूळ, धूर, प्रदुषण, हवेतील परागकण यांच्या संपर्कात आल्यानेही काही जणांच्या अंगावर पित्त उठते.

५) एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कपड्याची जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा त्वचा खूप नाजूक असल्याने एखादा कपडा सहन झाला नाही, तरीही काही जणांना पित्ताचा त्रास होतो.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

अंगावर पित्त येण्याचा खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच अधिक उत्तम. पण त्याआधी या काही गोष्टीही तुम्ही करून पाहू शकता..

१) सगळ्यात पहिलं म्हणजे अंगावर जेव्हा पित्त येतं तेव्हा तुम्ही कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत याबाबतीत एकदा थोडं निरिक्षण करा आणि नेमकी कशाची ॲलर्जी होते आहे हे एकदा तपासून पाहा.

२) अमसूलचा सार किंवा कोकम सरबत प्या. अमसूलाची पेस्ट करून ती अंगावर लावल्यानेही पित्त बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

३) पित्तामुळे अंगावर खाज येत असल्यास खोबरेल तेल किंवा कोरफडीचा गर लावा. अंगाची खाज, दाह कमी होण्यास मदत होईल.

४) रात्री झोपण्यापुर्वी चमचाभर एरंडेल तेल प्या. यामुळे रोजच्यारोज पोट साफ होऊन पित्ताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

2 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

8 तास ago