आरोग्य

पायऱ्या चढण्याचे फायदे

धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं असतं. पण बिझी लाइफस्टाईलमुळे सगळ्यांना व्यायामासाठी वेळ मिळतो असं नाही. अशात तब्येत तर बिघडतेच, सोबतच वजनही वाढू लागतं.

जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात, ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. जर हे आजार टाळायचे असतील आणि फिट रहायचं असेल तर जिम मध्ये तासंतास घाम गाळण्याची गरज नाही. एक छोट्याश्या सवयीने तुम्ही फिट राहू शकता. पायऱ्या चढणं हृदयासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जर दिवसभरात ५० पायऱ्या चढत असाल तर अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

हृदयरोगाचा धोका कमी होतो: नियमितपणे पायऱ्या चढून हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करता येतो. जे लोक एका दिवसात ५० पायऱ्या चढतात, त्यांना हृदयरोगांचा धोका पायऱ्या न चढणाऱ्या लोकांच्या तुलनेत २०% कमी असतो.

मसल्स मजबूत होतात: पायऱ्या चढल्यानं मसल्स मजबूत होतात. पायऱ्या चढण्यासाठी सरळ चालण्या पेक्षा जास्त मेहनत करावी लागते. पायऱ्या चढताना शरीर ग्रॅविटीच्या विरुध्द दिशेने जाते. असं केल्यानं लोअर बॉडी आणि पाठीच्या खालच्या भागात स्नायू तयार होतात.

कॅलरी बर्न होतात: पायऱ्या चढल्याने वजन कमी होते, तसेच कंट्रोल मध्ये राहते. पायऱ्या उतरल्यास प्रति तासात १७५ ते २७५ कॅलरी बर्न होतात. तर पायऱ्या चढून गेल्यास प्रति तासात ५३० ते ८३५ कॅलरी बर्न करू शकता.

हाडं मजबूत होतात: हाडांसाठी सुद्धा पायऱ्या चढणं फायदेशीर ठरतं. यानं हाडं मजबूत राहतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. सोबतच पायऱ्या चढल्यानं पायांची शक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात.

शरीर निरोगी राहत: लिफ्ट ऐवजी नियमितपणे पायऱ्यांचा वापर केला तर हृदय आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, तसेच ब्लड सर्कुलेशन सुधारतं. पायऱ्या चढल्यानं कोरोनरी हार्ट डिजीज, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलन कॅन्सर इत्यादीचा धोका कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

16 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

16 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

16 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago