आरोग्य

शेवग्याच्या शेंगांच्या सेवनाने गरोदरपणात आणि इतर वेळी होणारे फायदे

शेवग्याच्या शेंगांचा आहारातील समावेश हा गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उपयुक्त ठरतो. तसेच इ शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने इतर देखील अनेक आरोग्यविषयक फायदे होतात.

1) गरोदर असताना होणारा त्रास

गर्भावस्थेत दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे त्रास कमी करते

2) गरोदपणतील मधुमेहावर गुणकारी

शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच गरोदपणात होणाऱ्या मधुमेहावर गुणकारी

3) प्रसूतीनंतरचा त्रासावर उपयुक्त

सुकर प्रसुतीसोबतच गर्भारपणाच्या काळातील आणि प्रसुतीनंतरच्या दिवसातील त्रास कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स आणि मिनरल्स घटक गर्भाशयाचे कार्य आणि आरोग्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.

4) रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत

शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.

5) पोटाचे आरोग्य: शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्या नेजुलाब आणि कावीळ बरा होतो शेवग्याच्या पानांमध्ये, शेंगांमध्ये बी कॉम्पलॅक्स घटकांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स पचनकार्य सुधारते. कार्बोहायाड्रेट्सचे विघटन सुकर होते तसेच प्रोटीन आणि फॅट्सचा शरीराला फायदा होतो.

6) हाडांचे आरोग्य: शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मुबलक व्हिटामिन्स आढळतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.

7) रक्तशुद्धी: शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅन्टीबायोटीक म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारात् त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात

8) लैंगिक आरोग्य: शेवग्याच्या शेंगांमधील झिंक घटक स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरते. शेवग्याची शेंग एवढी गुणकारी असली तरी प्रत्येक गोष्टीचे सेवन प्रमाणात करावे एकाच दिवशी भरपूर असे करू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

11 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

11 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

18 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

18 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

18 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

18 तास ago