१) वजन कमी होते: जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक कप गरम पाणी प्यायला सुरु करा.
२) सर्दी खोकल्यांपासून सुटका: कोणत्याही मोसमात तुम्हाला छातीत दुखणं आणि खोकला सारखे आजार होत असतील तर गरम पाणी ह्यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे गळा पण ठीक राहतो. ह्याच्या सेवनाने आराम मिळतो.
३) पिरियड्स सोपे बनवते: पिरियड्सचे दुखण्यामुळे महिलांना सर्वच कामांमध्ये ब्रेक लागतो. गरम पाणी ह्या दुखण्यावर आराम मिळण्याचे काम करते. ह्या दरम्यान गरम पाण्याने पोटावर सेक करण्याने सुद्धा खूप फायदा होतो.
४) शरीर डिटॉक्स करते: गरम पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आणि हे शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी खूप सहज स्वच्छ करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. ज्यामुळे घाम येतो आणि ह्याद्वारे शरीरातील सर्व अशुद्धता दूर होतात.
५) वाढते वय थांबते: चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या जर तुमची चिंता वाढवत असेल तर काळजी करायचे काही कारण नाही. आजपासूनच गरम पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यातच ह्याचे काम बघा. त्वचेमध्ये तरतरी येऊ लागेल आणि त्वचा चमकदार सुद्धा होईल.
६) केसांसाठी फायदेशीर: ह्याशिवाय गरम पाणीचे सेवन केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामुळे केस चमकदार बनतात आणि हे केसांच्या वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.
७) पोटाला ठेवते दुरुस्त: गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते आणि हे ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावा. असे करण्याने जेवण लवकर पचते आणि पोट हलके होते.
८) रक्तप्रवाह (ब्लड सर्क्युलेशन) सुरळीत ठेवते: शरीराला योग्य पद्धतीने चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत चालणे खूप आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.
९) शरीराची ऊर्जा वाढते: सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची एनर्जी लेव्हल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण नीट राहते.
१०) गुडघ्याचे दुखणे दूर करते: गरम पाणी गुडघ्याचे दुखणे कमी करते. आपल्या मांसपेशींमध्ये ८०% भाग पाण्याने बनलेले आहे आणि पाण्यानेच मांसपेशींच्या गाठी दूर होतात.
११) गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून पिणे योग्य आहे. अन्यथा तोंड भाजण्याची शक्यता आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…