आरोग्य

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे…

१) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

२) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत.

३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.

४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.

५) खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.

६) व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

७) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

८) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

९) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.

१०) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

११) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

१२) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

१३) रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.

१४) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.

१५) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.

१६) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

१७) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

१८) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.

१९) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

२०) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

6 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago