राजकीय

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला, कारण काय

 

मुंबई: मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला झाला आहे. पुण्यातील दिवे घाट परिसरात ही घटना घडली आहे. आदित्य हाके असं लक्ष्मण हाके यांच्या मुलाचे नाव आहे. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हल्लेखोरांबाबत माहिती नाही

लक्ष्मण हाके यांचा मुलगा आदित्य हाके यांच्या मुलावर हल्ला कोणी केला याबाबत माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे सतत मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये असं हाके यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा तरुणांकडून तर हा हल्ला करण्यात आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आधी लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी

याआधी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली होती. लक्ष्मण हाके हे निरा येथे आले होते, ते एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. ही माहिती तरुणांना मिळतातच हॉटेलच्या बाहेर येऊन तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतलं.

मनोज जरांगे यांच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत. राज्य सरकारकडून जरांगेच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago