आरोग्य

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. त्यासोबतच यात कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही भरपूर असतं. हिवाळ्यात जर तुम्ही रोज याचं सेवन केलं तर काय काय फायदे मिळतील.

१) मेंदुसाठी फायदेशीर: ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदुला देखील अनेक फायदे मिळतात. यात आयर्न आणि व्हिटॅमिन बी६ आढळतं जे मेंदुची काम करण्याची क्षमता वाढवतं. तसेच स्मरणशक्तीही वाढते.

२) शुगरमध्ये फायदेशीर: ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा.

३) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्ससोबतच अनेक अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सही असतात. जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात. यात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचा उजळवतं. तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होते.

४) स्मरणशक्ती वाढते: हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.

५) पोट राहतं साफ: जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.

६) उलटी होईल दूर: उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.

७) रोगप्रतिकार शक्ती वाढते: खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

57 मिनिटे ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago