आरोग्य

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते. यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही; जाणून घ्या लवकर उठण्याचे काही फायदे…

आत्मविश्वास वाढतो: सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते. त्यामुळे दिवसभरातील कामे यशस्वी होतात.

स्वतःसाठी वेळ द्या: सध्याच्या काळात आपण दुसऱ्यासाठी भरपूर वेळ देत असतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. पहाटे उठण्याचा हा देखील एक फायदा आहे.

कामात मन लागते: सकाळी लवकर उठल्यामुळे आपले मन हे अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लीत राहते. त्यामुळे आपण जे काही काम हाती घेतो त्यामध्ये आपली गोडी वाढते. त्या कामात आपले मन लागते.

सकारात्मकता: पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्याला शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता येतो. त्यामुळे जेव्हा आपले मन प्रसन्न व आनंदी असते अशावेळी आपल्या विचारसरणीमध्ये एक सकारात्मकपणा असतो.

वाचन: सकाळचे वातावरण शांत आणि निवांत असते. अशावेळी आपण पहाटे उठून वाचन केले तर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मिळते. सकाळच्या वेळी वातावरण शांत असल्याने आपल्याला वाचनात अजिबात अडचणी येत नाहीत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

1 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

14 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

14 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

20 तास ago