आरोग्य

शरीरातील कॅल्शियमची कमतरता व उपाय

कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा होतो परिणाम.

आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये असतं, परंतु रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा या स्थितीला हायपोकॅल्सीमिया असं म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती आहे, कारण यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. सामान्यत: कॅल्शियम हे अन्नपदार्थातून मिळतं, परंतु काही वेळा खाण्या पिण्यातून पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास डॉक्टर सप्लिमेंट्सही देतात. यामुळे कॅल्शियमची लेव्हल नीट ठेवण्यास मदत होते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणं, प्रचंड थकवा येणं, नखं आणि केस कमकुवत होणं, हाडं दुखणं आणि ब्रेन फॉग अशी लक्षणं दिसू लागतात. दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता असल्यास लोकांना चक्कर येऊ लागते आणि हाडांशी संबंधित ऑस्टिओपोरोसिस हा आजार होऊ शकतो. हा असा आजार आहे ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होतं आणि चालायला त्रास होऊ लागतो. या आजारावर कोणताही अचूक उपचार नाही. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, दूध, दही, चीज, दही, ताक यासह सर्व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केलं पाहिजे. दूध हा कॅल्शियमचा चांगला सोर्स मानला जातो. याशिवाय हिरव्या भाज्या, कडधान्ये, बदाम, चिया सीड्स, तीळ, खसखस ​​यासह अनेक शाकाहारी पदार्था मध्ये कॅल्शियम भरपूर असतं. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago