आरोग्य

पायात गोळे येणे कारणे व उपाय

बऱ्याच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.

1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.

२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..

३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ पावडर मिसळून घ्या आणि यांच्या बोरा इतक्या ७ गोळ्या करा आणि दररोज उपाशी पोटी सकाळी १ गोळी घ्या. असे ७ दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.

४) ४ बदाम, १ चमचा कच्चे तिळ आणि १ चमचा खडिसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी १ महिना खावे. आयुष्यभर पायात गोळे येणार नाही..

५) १ पेलाभर दूधामध्ये १ चमचा नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्या आणि यात ५ भिजवलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा. असे १० दिवस करा.. शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..

६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून २ वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.

७) रोज सकाळी २ डोंगरी आवळे अनशा पोटि खावे आणि दिवसातून एकदा केळं खावे.

८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago