आरोग्य

पित्त होण्याची कारणे व उपाय…?

आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.

अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.

ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.

भावनिक ताण: कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय…

अमृत फळ आवळा: चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो.

मूग आणि तांदूळ: जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

उष्ण आल आणि रसदार लिंबू: आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते. जेवणात आलं घ्याव. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.

कोकम: आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील प्रचुर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते.

थंड दुध: थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.

पिकलेले केळे: केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

14 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

14 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

18 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

18 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

18 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

18 तास ago