डायबिटीजच्या रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन

आरोग्य

मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते.

मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड असते. अमीनो अ‍ॅसिड ब्लड शुगरचे प्रमाण कमी करण्यास आणि त्याची पातळी कमी करण्यास मदत करु शकते. त्यामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते, आणि मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. मेथीचे सेवन कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते ते जाणून घेवूयात.

जेवण: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या जेवणात मेथीचा वापर करु शकता. भाजीत घालून खाऊ शकता. त्यामुळे भाजीची चव वाढण्यासही मदत होऊ शकते.

मेथीचे पाणी: रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर कंट्रोल राहते. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या.

चावून खा: मेथी चावून खाल्ली तर आणखीनच चांगले आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खावे आणि नंतर पाणी प्यावे.
त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)