आरोग्य

गाय म्हशीच्या दुधातील फरक

म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं. गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं चार टक्क्यांपर्यंत कमी फॅट्स असतात. गायीच्या दुधात ३-४% फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८% फॅट्स असतात. त्यामुळेच म्हशीचं दूध पचण्यासाठी जड असतं. याच्या तुलनेत गायीचं दूध पचायला हलकं असतं.

गायीच्या दुधात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. नवजात बालकांना कुठल्याही कारणांनी आईचं दूध मिळत नाही, पिता येत नाही; अशा बाळांना गायीचं दूध पाजलं जातं.

आहार नियंत्रण बाबत विचार कराल, तर गायीचं दूध प्यावं, आणि जर वजन वाढवायचं आहे आणि अशक्तपणा असेल तर म्हशीचं दूध प्यावं. गायीचं दूध पातळ असतं आणि यात जवळपास ८८% पाणी असतं. हेच कारण आहे की गायीचं दूध पचायला हलकं असतं. तर म्हशीच्या दुधात पाण्याचं प्रमाण हे ७०% पर्यंत असतं.

शरीराला प्रोटीनची कमतरता असेल, तर म्हशीचं दूध प्यावं. गायीच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधात १० ते ११% अधिक प्रोटीन असतं. प्रोटीन मुळेच म्हशीचं दूध हे हीट रेजिस्टंट असतं आणि यामुळेच आजारी, वृद्ध आणि नवजात बाळांना म्हशीचं दूध देऊ नये.

म्हशीच्या आणि गायीच्या दुधातील फरक म्हणजे कोलेस्ट्रॉल. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेनं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं. म्हणून म्हशीचं दूध हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अवश्य प्यावं.

म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि फॅट्स दोन्ही जास्त असतात. तर गायीच्या दुधात हे दोन्ही कमी असतात. एक कप म्हशीच्या दुधातून २७३ कॅलरीज मिळतात, तर १ कप गायीच्या दुधातून १४८ कॅलरीज मिळतात.

म्हशीचं दूध प्यायल्या नंतर शांत झोप येत नाही, तर गायीचं दूध झोपण्यापूर्वी प्यायल्यानं चांगली झोप लागते.

म्हशीच्या दुधापासून बनवलेलं पनीर, खवा, दही, खीर, कुल्फी, तूप अधिक चविष्ट होतं. तर गायीच्या दुधापासून बनवलेले हे पदार्थ वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात.

कॅल्शिअमचं प्रमाण म्हशीच्या दुधात अधिक असते. तर गायीच्या दुधात पोटॅशिअम आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं, म्हणून लहान मुलांना आणि हाय ब्लडप्रेशन असणाऱ्यांना गायीचं दूध फायदेशीर असतं.

गायीचं दूध पित्तशामक असतं आणि पचनक्रिया सुधारतं. तर म्हशीचं दूध पचायला जड असतं, म्हणून त्यापासून बनवलेलं तूप हे कफ आणि पित्तकारक असतं.

जर तुम्हाला कुठलाही त्रास नाही आणि वजनही कमी आहे, तर मग म्हशीचं दूध पिणं फायदेशीर ठरतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

15 मिनिटे ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

18 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago