आरोग्य

चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, व्हिटामिन बी ९) आणि सेलेनियम यासारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर ओमेगा ३, फॅटी अॅसिड, DHA, EPA सारखे पोषक घटकही असतात. त्यामुळे लोक अंडी खातात.

कच्ची अंडी का खाऊ नयेत 

कच्ची अंडी न खाण्याबद्दल कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगली असतात, हे एक मिथक आहे. पोटाच्या विकार उद्भवण्याची शक्यता असते, त्यामुळे कच्ची अंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो.

कच्ची अंडी खाण्यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन, सूज येणे यासारखा त्रास सुरू होऊ शकतो. कच्च्या अंड्याचा वास खूप उग्र असतो, त्यामुळे उलट्या होऊ शकतात. इतकेच नाही, चिडचिडपणाही होऊ शकतो. कच्ची अंडी पचवणे कठीण असते. पोटात सूज येऊ शकते आणि त्यामुळे श्वास घेताना दम लागू शकतो.

दररोज एका कच्च्या अंड्याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्तीवरही जास्त दबाव येऊ शकतो. ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांनी उकडून किंवा कच्च्या अंड्याचे सेवन टाळायला हवे. कच्च्या अंड्याचे सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago