आरोग्य

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे.

आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं आहे. त्याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतोच. त्यामुळेच हल्ली चष्मेबहाद्दुरांचं प्रमाण वाढलं आहे. काही लोक खूप स्टायलिश पद्धतीने चष्मा कॅरी करतात. पण काही लोकांना मात्र तो मुळीच आवडत नाही तुम्हालाही चष्मा लावणं आवडत नसेल किंवा नजर तेज करायची असेल तर या काही गोष्टी काही दिवस नियमितपणे करून पाहा.

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी…

डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकपणे वाढवून चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काय करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ योग अभ्यासकांनी officialcanwinn या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी साधे सोपे ४ उपाय सुचवले आहेत.

पहिला उपाय म्हणजे सगळ्यात आधी तर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते दोन्ही तळवे डोळ्यांना लावा. तळहातांमध्ये तयार झालेली उष्णता डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

यानंतर बोटाच्या टोकाला थोडी लाळ लावावी आणि ती काजळ लावल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना लावावी. आपले अनेक विकार कमी करण्यासाठी लाळ उपयुक्त ठरते. त्यामुळेच तर सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी प्यावं, असं सल्ला काही याेगतज्ज्ञ नेहमीच देतात.

त्यानंतर हाताच्या पहिल्या ३ बोटांपैकी एक बोट एका डोळ्याच्या नाकजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर, दुसरे बोट कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधे आणि तिसरे बोट दुसऱ्या डोळ्याच्या नाकाजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर ठेवा आणि तिथल्यातिथेच ५ वेळा बोट क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज या पद्धतीने गोलाकार फिरवा.

त्यानंतर बोटाच्या टोकांनी डोळ्यांच्या आसपासचा भाग, कपाळ याठिकाणी १५ ते २० सेकंदासाठी टॅपिंग करा. यानंतर पुन्हा दोन्ही तळहात एकमेकांवर घासून हातांची उष्णता डोळ्यांना द्या. काही महिने नियमितपणे हा उपाय केल्यास चष्म्याचा नंबर कमी होईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago