आरोग्य

सुर्यनमस्कार घाला आणि फिट व्हा

निरोगी राहण्यासाठी तसचं मानसिक स्वास्थ जपण्यासाठी योगसाधना किंवा योगाला मोठं महत्व आहे. शरीर बळकट करण्या सोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. नियमित योगा केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.

सुर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसनं आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. शिवाय तणाव दूर होण्यासही मदत होते. नियमितपणे केवळ १०-१५ मिनिटं किंवा केवळ ११ सुर्य नमस्कार योग्यरित्या केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या दूर होऊन शरीराला अनेक फायदे मिळतील. इतर व्यायाम किंवा योगा करण्याचीही आवश्यकता भासणार नाही. तेव्हा जाणून घेऊयात सुर्य नमस्काराचे फायदे.

पचन सुधारत

नियमित सुर्यनमस्कार केल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते. तसचं पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. सुर्यनमस्कारामुळे आतड्यांचं कार्य देखील सुधारत. तसचं गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सुर्यनमस्कार फायदेशीर आहेत.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत

सुर्यनमस्कार करताना योग्यरित्या श्वासोच्छवास घेणं गरजेचं आहे. यामुळे आसन करताना हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचते. परिणामी रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि शरीरातील कार्बनडॉक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते. फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते.

मणका बळकट होतो

अलिकडे कार्यालयातील एकाच जागी तासनतास बसून केल्या जाणाऱ्या कामांमुळे पाठीच्या कण्याचे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. यासाठी सुर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरासोबत पाठीच्या मणक्याला बळकटी मिळते. सुर्य नमस्कार घालताना संपूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग होत असल्याने स्नायू आणि लिगामेंट देखील मजबूत होतात. तसचं कंबरही लवचिक होते.

पोट आणि वजन कमी हाईल

नियमित सुर्य नमस्कार घातल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. डाएटिंगहून अधिक जलद जर वजन कमी करायचं असेल तर सुर्य नमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल.

पोट आणि मजन कमी हाईल 

नियमित सुर्यनमस्कार घातल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. डाएटिंगहून अधिक जलद जर वजन कमी करायचं असेल तर सुर्य नमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल.

ग्लोइंग त्वचा

दररोज सुर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते. तसचं त्वचेसंबधी समस्या दूर होतात. सुर्य नमस्कारामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होवून तुम्ही तरुण दिसू लागता. तरुण दिसण्यासाठी नियमित ११ सुर्यनस्कार घालणं फायदेशीर ठरू शकतं.

मानसिक आरोग्य सुधारत

सध्याच्या ताण तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्य जपण्यासाठी सुर्य नमस्कार फायद्याचे आहेत. सुर्य नमस्कारांमुळे नर्वस सिस्टम आणि स्मरणशक्ती सक्षम होण्यास मदत होते. सकाळच्या वेळी सुर्यनमस्कार घातल्याने चिंता आणि तणाव दूर होवून मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

मासिक पाळीतील समस्या

नियमित सुर्य नमस्कारामुळे अनियमित पाळीची समस्या दूर होईल. सुर्य नमस्कारामुळे पोटाचे स्नायू मजबूत झाल्याने मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. तसचं यामुळे ब्लड फ्लो कमी होण्यासही मदत होते.

इतर फायदे

या काही महत्वाच्या फायद्या सोबतच सुर्य नमस्कारामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, थायरॉइड्चा समस्या दूर करण्यासाठी सुर्यनमस्कार फायदेशीर ठरतं.

या व्यक्तींनी सुर्यनमस्कार घालू नये

गर्भवती महिलांनी सुर्यनमस्कार घालू नये.

हार्निया आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती

पाठीचं दुखणं किंवा इतर समस्या असेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तज्ञांच्या सल्ल्याने सुर्यनमस्कार घालावेत

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago