आरोग्य

तुम्हीही एका दमात पाणी घटाघट पिता का? ही वाईट सवय बिघडवते शरीरातील पाण्याचं संतुलन

पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं.

पाणी शरीरात कसं शोषलं जात

पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत ते रक्तप्रवाहात शिरायला सुरुवात करतं. मात्र, संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी म्हणजेच पाणी शरीराच्या ऊतींपर्यंत, अवयवांपर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचणं — साधारण ३० ते ४५ मिनिटांत होतं.” ही वेळ प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची स्थिती, द्रवपातळी आणि त्या वेळी शरीरातील पाण्याची पातळी किती कमी आहे यावर अवलंबून असते.

पाणी शोषणावर परिणाम करणारे घटक

शर्मा सांगतात, “रिकाम्या पोटी पाणी अधिक वेगाने शोषलं जातं. तसेच सोडियम, पोटॅशियम, आणि ग्लुकोजसारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीराला पाणी धरून ठेवण्यास मदत करतात. थंड (पण बर्फासारखं नव्हे) पाणी गरम पाण्यापेक्षा अधिक प्रभावीपणे शोषलं जातं.”

व्यायामादरम्यान शरीराला तातडीने द्रवांची गरज भासल्यामुळे त्या वेळी पाणी जलद शोषलं जातं. उलट काही आरोग्य समस्या — जसे की अतिसार, उलट्या किंवा मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी — पाणी शोषणाचा वेग कमी करू शकतात.

घटाघट की हळूहळू पाणी पिणं योग्य

अनेकांना वाटतं जास्त पाणी एकदम प्यायलं की शरीरातील पाण्याची पातळी झटपट वाढते. पण तसं नाही. शर्मा स्पष्ट करतात, “दिवसभरात थोडं-थोडं पाणी पिणं अधिक प्रभावी ठरतं, त्यामुळे शरीरात सतत द्रवपातळी संतुलित राहते आणि रक्तातील मिठाचं प्रमाण योग्य राहतं.”

याउलट, एकदम खूप पाणी प्यायल्यास पोट फुगणं, वारंवार लघवी लागणं आणि शरीरातील पाण्याची पातळी वाढल्याचा भास होऊ शकतो. एवढंच नाही तर जेवणाच्या वेळी जास्त पाणी घेतल्यास पोटातील आम्ल विरळ होतं आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होतो.

खाण्यापिण्याच्या सवयींचाही परिणाम

“आपण जे खातो-पितो त्याचाही शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो,” असं शर्मा सांगतात. सूप, नारळ पाणी, संत्रं, कलिंगड यांसारख्या नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पदार्थांमुळे शरीरातील पाण्याची पातळी सुधारते; तर दारू, कॅफिन, साखरयुक्त पेये आणि अतिखारट पदार्थ शरीरातील पाणी कमी करून निर्जलीकरण वाढवतात.

शरीराला पुरेसं पाणी मिळणं म्हणजे फक्त तहान भागवणं नव्हे. शरीरातील पाण्याची पातळी राखणे ही एक प्रक्रिया आहे, जी हळूहळू आणि सातत्याने घडते; त्यामुळे दिवसभरात थोडं-थोडं पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीर तंदुरुस्त, ऊर्जा भरलेलं आणि पेशींपर्यंत पोषण मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

16 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

16 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

16 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

20 तास ago