shirur-police
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रामलिंग हत्ती रोड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी काही काळात चोरट्याला जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल ₹1,14,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या रामलिंग हत्ती रोड (जाधव मळा, शिरूर ग्रामीण) येथील घराचे कुलूप तोडून 20 नोव्हेंबर 2025 रोजी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹2,60,000 किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 829/2025 भादंवि कलम 331(3), 331(4), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवला. तपास पथकाने घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आयकार युनिटचे तज्ञ संदीप चिर्के यांनी दिलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. या तपासात आरोपी प्रकाश विलास गायकवाड (रा. रामलिंग रोड, शिरूर) यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. रामलिंग परिसरात आरोपी हालचाल करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. आरोपीला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस कोठडीत झालेल्या चौकशीत आरोपीकडून ₹1,14,900 किमतीचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल,अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले,पोलिस निरीक्षक संदेश केंजळे,कार्यवाहीत मोलाचे योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी संदीप चिर्के (कनिष्ठ तज्ञ, आयकार युनिट पुणे ग्रामीण), यांच्या मार्गदर्शना खाली पोसई शुभम चव्हाण, नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे. शिरूर परिसरात वाढत असलेल्या घरफोडी गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि तपास कौशल्य नागरिकांमध्येही दखलपात्र ठरत आहे. अटक व मुद्देमाल जप्तीमुळे शिरूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
शिरूर! दोन भावांच्या जमिनीतील १३०० डाळिंब झाडांची निर्दयी तोड; कोणी केली पाहा…
शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…
शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…