आरोग्य

आतड्याच्या आरोग्याविषयी तुमच्याही मनात ‘हे’ गैरसमज आहेत का

आपले आरोग्य सुधारण्यासाठी इंटरनेटवर बरेच हॅक सांगितले जातात. त्यात खासकरून आतड्याच्या आरोग्याला अधोरेखित केले जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सांगितले जाणारे बरेच हॅक पाहून आपणसुद्धा असे करून बघायचे का, असा प्रश्न एकदा तरी आपल्या मनात येतोच.

प्रोबायोटिक्सचा प्रचार आतड्याच्या आरोग्यासाठी केला जातो. पण, प्रोबायोटिक्स घेणे प्रत्येकासाठी योग्य नसते. खरं तर, प्रोबायोटिक्सचा ताण आल्याने तुमची लक्षणे बिघडू शकतात. त्यामुळे प्रोबायोटिक्स घेताना तज्ज्ञांच्या मते दोन प्रमुख घटक तुम्ही पाहिले पाहिजेत. प्रोबायोटिकमध्ये साखर किंवा कृत्रिम स्वीटनर जोडले आहे का? यापैकी एकही गोष्ट त्यात असेल, तर त्यामुळे तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोटा विस्कळित होईल.

प्रोबायोटिक ॲसिड प्रतिरोधक आहे का? जर ते आम्ल प्रतिरोधक नसेल, तर ते पोटातून जात नाही आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. मोठ्या आतड्यात बहुतेक सूक्ष्म जीव राहतात. त्याऐवजी प्रोबायोटिक्ससारखे ग्रीक योगर्ट किंवा केफिरसारखे पारंपरिक आंबवलेले पदार्थ खा.

२) १५ दिवसांचे डिटॉक्स किंवा क्लीन्स / गट हिलिंग प्रोटोकॉल

या गोष्टी तुम्हाला उत्साही किंवा प्रभावी उपाय देणाऱ्या वाटू शकतात. पण, मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणले की, ते मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. १५ दिवसांचे डिटॉक्स केल्यानंतर ऊर्जेच्या बाबतीत सुधारणा वाटू शकते आणि तुम्हाला हलकेसुद्धा वाटू शकते. तरीही यामुळे तुम्हाला चक्कर येणे, कमी उत्साही किंवा तुमचे स्नायू कमी होऊ शकतात आदी समस्या जाणवू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला स्नायू टिकवून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे मानवी शरीरातील अवयव जसे की यकृत, मूत्रपिंड हे डिटॉक्स करण्यासाठी सुसज्ज आहेत आणि आपल्याला निरोगी ठेवतात, असेही त्या म्हणाल्या.

३) वनस्पती-आधारित आहारामुळे आतड्याचे आरोग्य नेहमीच सुधारू शकत नाही

अधिक वनस्पती-आधारित पदार्थ खाणे हे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्या असतील, तर जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणून दिले की, काही वनस्पती-आधारित पदार्थ पचायला जड असतात. त्याशिवाय, जर शाकाहारी आहार योग्यरीत्या संतुलित केला नाही, तर अनेक पौष्टिक कमतरता जाणवू शकते. म्हणून आतड्याचेआरोग्य सुधारण्यासाठी पूर्णपणे शाकाहारी राहणे प्रत्येकाला नेहमीच मदत करू शकत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago