मुख्य बातम्या

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन रेशनदुकान दाराने लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करु नये म्हणुन रेशन चालकाच्या मुलाने पिडीत महिलेला सर्वांसमोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी महिला गेलेली असताना गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या काही बगलबच्चांनी ‘त्या’ महिलेला फिर्याद मागे घेण्यासाठी पोलिस स्टेशन मध्येच दबाव आणल्याची खात्रीलायक माहिती आहे.

तसेच पोलिस स्टेशन मध्ये पिडीत महिलेची फिर्याद दाखल करु नये म्हणुन करडे गावातील एका बड्या राजकीय नेत्याने पोलिसांना फोनद्वारे संपर्क साधला. परंतु पिडीत महिला फिर्याद दाखल करण्यावर ठाम असल्यामुळे या नेत्याचाही नाईलाज झाला.

शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल गेल्यानंतर त्या महिलेसह तिच्या कुटुंबीयांना शिरुर येथील एका हॉटेल मध्ये बोलावून फिर्याद मागे घेण्यासाठी ‘प्रतिज्ञापत्र’ लिहून देण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे सदर पिडीत महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष घालणार का…?

शिरुर पोलिस स्टेशन मध्ये यापुर्वीही गंभीर गुन्हा दाखल असताना राजकीय पाठबळ असणारा एक माजी पंचायत समिती सदस्य मोकाट फिरत आहे. गुन्हा दाखल होऊन जवळपास एक महिना होऊनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. कारण पोलिसांवर थेट ‘वरुन’ आरोपीला अटक न करण्यासाठी प्रचंड दबाव असल्याची दबक्या आवाजता सगळीकडे चर्चा आहे. तसेच करडे येथील महिलेच्या विनयभंग प्रकरणातही करडे येथील राजकीय पुढारी हस्तक्षेप करत असल्यामुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकारी यात लक्ष घालणार का…? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago