आरोग्य

तुमच्या घरात First Aid बॉक्स आहे ना, आणीबाणीच्या काळात प्रथमोपचार डब्यात पाहा काय असणं मस्ट

युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरात साधा फस्ट एड बॉक्सही नाही.. तसं काहीआपण करुन ठेवतच नाही.. खरंतर ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात लेकराबाळांना सतत लागतं, ते सारखे पडतात- झडतात, स्वयंपाक करताना आपल्यालाही कूुठेतरी भाजतं, कधीतरी काहीतरी खरचटतं, बोट कापलं जातं.. असं काही झालं की मग आपण ऐनवेळी धावपळ करतो बँडेज, कात्री, औषधं शोधत घरभर पळतो. त्यामुळे निदान घरात एक फस्ट एड बॉक्स तरी हवाच पण म्हणजे नेमकं काय काय हवं त्या बॉक्समध्ये ते पाहा..

फस्ट एड बॉक्समध्ये कोणकाेणत्या गोष्टी असायला हव्या

हा बॉक्स तयार करण्यासाठी तुमच्या घरातला कोणताही एखादा डबा घेतला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या डब्यात फक्त प्रथमोपचारासाठी गरजेच्या असणाऱ्या सगळ्या वस्तू असायला हव्या. त्या बॉक्समध्ये लहान- मोठ्या आकाराच्या वेगवेगळ्या मेडिकल पट्ट्या असायला हव्या. याशिवाय कापसाचे काही बोळे तसेच मेडिकेटेड कापसाचे एक लहानसे पॅकेट असणेही गरजेचे आहे. सॅनिटायझरची एक छोटीशी बाटलीही त्यामध्ये असू द्या. कारण कोणावरही कोणीही उपचार करत असेल तर सगळ्यात आधी हात सॅनिटाईज होणं गरजेचं आहे. त्यासोबतच बॅण्डेजचे पाकिट, ॲण्टीसेप्टिक लिक्विड, ॲण्टीसेप्टिक क्रिम अशी औषधीही असायला हवी.

फस्ट एड बॉक्समध्ये एखादा छोटा नॅपकिन, एखादा छोटा खराब कपडा तसेच मास्क, रुमाल, थर्मामीटर, सर्दी-खोकला- ताप अशा औषधींच्या गोळ्या, पोटदुखीचे औषध, ॲण्टीबायोटिक्स अशा वस्तूही ठेवा. कात्री, प्लास्टिकच्या काही पिशव्या, मेडिकेटेड टेप, वर्तमान पत्र, मास्क अशा वस्तूही ठेवा. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या फस्ट एड बॉक्समध्ये असतील तर ऐनवेळी धावपळ होणार नाही. गरजू व्यक्तीला अगदी चटकन योग्य ते प्रथमोपचार मिळू शकतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago