आरोग्य

तुम्हाला कंबरदुखी, मणक्याचे विकार, हाडांचे दुखणे आहे का

शेतकरी असो की नोकरदार मंडळी. आज बदलत्या आजार शैलीमुळे सगळ्यांनाच हाडांचे विकार जडत आहेत. संधिवात, हाडांचे दुखणे, सांध्यांचा त्रास अशा हाडांच्या दुखण्याने अनेक जण बेजार आहेत. यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय आणि उपचार पद्धती आहेत. वयोमानानुसार, संधिवात, अपघात, हाडांचे झिजणे किंवा कॅल्शियम/व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडांच्या समस्या उद्भवतात.

अमरकंद: हाडांच्या विकारांपासून आरामासाठी, मणक्याच्या दुखापती, हात-पायाला सुन्नपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचा दावा वनस्पतीशास्त्रज्ञांनी केला आहे. “अमरकंद” हा शब्द “अमर” (अमरत्व) आणि “कंद” यांच्यातून बनला आहे, ज्याने तिला दीर्घायुष्य व आरोग्यवर्धक समजण्यात येतं. आयुर्वेदिक उपचारांमध्ये सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी दूर करण्यासाठी अमरकंद वापरला जातो, आणि त्याला “दैवी वरदान” मानलं जातं.

हाडांसाठी इतर आयुर्वेदिक औषधी

1) अश्वगंधा: हाडे मजबूत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त

2) गुग्गुळ (योगराज गुग्गुळ, महायोगराज गुग्गुळ): संधिवात आणि सूज कमी करण्यास मदत करते

३) हडजोड: हाडे जुळवण्यासाठी प्रसिद्ध औषधी.

4) शल्लकी: सांध्यातील सूज आणि वेदना कमी करते.

आहार व पोषण

1) कॅल्शियमयुक्त आहार. (दूध, तूप, बदाम, तीळ, डाळिंबाचा समावेश)

2) व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाशात बसावे.

3) हिरव्या पालेभाज्या, अंजीर, खजूर, उडीद डाळीचे सेवन करावे.

4) अतिप्रक्रियायुक्त, तळकट व अति थंड पदार्थ टाळावेत.

घरगुती उपाय

1) कोमट तेलाने (मुरगळ तेल, नारळ किंवा तीळ तेल) हलक्या हाताने मालिश करावी.

2) गरम पाण्याची बॉटल किंवा गरम शेक.

3) हळदीचे दूध. (हळद + दूध + थोडेसे तूप)

4) मेथीदाणे व आल्याचा काढा.

जीवनशैलीतील बदल

1) हलके व्यायाम करावेत.(योगातील त्रिकोणासन, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन इ.)

2) वजन नियंत्रणात ठेवणे.

3) जास्त वेळ बसणे/उभे राहणे टाळणे.

4) पुरेशी झोप व तणावमुक्त जीवनशैली अवलंबावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

3 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

3 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

3 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

3 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

3 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

3 तास ago