महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड
नाशिक: महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व लाभले असून राज्यभर खेळाच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार सल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.
ही निवडणूक हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नाशिक येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार येथे पार पडली. या निवडणुकीत निवृत्त न्यायमूर्ती मा. श्री. भगवंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
नवीन निवडून आलेली कार्यकारिणी
अध्यक्ष : अतुल सावे
वरिष्ठ उपाध्यक्ष : विजय सोनवणे (जळगाव)
उपाध्यक्ष
हनुमंत लुंगे (अमरावती), उदय पवार (धुळे),
गजानन गुपिले (नांदेड), रविदास शिरोडकर (सिंधुदुर्ग)
कोषाध्यक्ष : शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश धोंडगे (नाशिक)
महासचिव : रणधीर सिंग (मुंबई)
सहसचिव
आनंद चव्हाण (सोलापूर), मिलिंद शिंदे (ठाणे),
पंकज भारसाखळे (छ. संभाजीनगर), अभिजित वनिरे (कोल्हापूर)
कार्यकारिणी सदस्य
प्रवीण सिंग (गडचिरोली), किरण थोरात (पालघर), गणेश शिरसाठ (यवतमाळ),
दर्शन रोकडे (वाशीम), प्रवीण अंबेकर (रत्नागिरी),
गणेश माळवे (जालना), शीतल नितीन जाधव (वर्धा)
ग्रामीण व गुणवंत खेळाडूंना प्राधान्य
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मा. ना. अतुल सावे यांनी सांगितले की, राज्यात नियमित राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धा, तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंसाठी संरचित हँडबॉल लीग स्पर्धा सुरू करण्यात येतील. यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य व आर्थिक सहाय्य देण्याचा संघटनेचा ठाम संकल्प आहे. सध्या महाराष्ट्रातील ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांत हँडबॉल संघटनात्मक रचना कार्यरत असून, आगामी काळात शालेय, महाविद्यालयीन स्तरावर प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, तसेच टॅलेंट सर्च उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…