आरोग्य

तुम्हाला उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे? मग या 5 आजारांना तुम्ही देताय आमंत्रण…

तुम्हीही उभे राहून पाणी पीत असाल तर आजपासूनच ते बंद करा. अन्यथा शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

किडनी समस्या: उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिऊ नये. असे केल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते. यासाठी तुम्ही आरामात बसून हळूहळू पाणी प्यावे.

सांधेदुखीची समस्या: उभे राहून पाणी पिण्याची सवय सांध्यांना हानी पोहोचवू शकते. यासोबतच सांधेदुखीची लक्षणेही उद्भवतात. उभे राहिल्याने मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो आणि यावेळी पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव संतुलनावर परिणाम होतो, ज्यामुळे सांधे दुखतात.

फुफ्फुसांचे नुकसान: जर तुम्हाला फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिणे टाळावे. याचे कारण असे की, जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात. तेव्हा ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे फुफ्फुसांपासून हृदयाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

पचनाच्या समस्या: वास्तविक पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. पण पाणी नीट न प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. असे होते कारण जेव्हाही आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने खाली जाते आणि पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. मग हे पाणी पचनसंस्थेला हानी पोहोचवते.

तहान लागणे: उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण असे केल्याने तहान भागत नाही. वारंवार पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे पुन्हा-पुन्हा तहान लागल्यास उभ्याने न पिता बसून पाणी प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

6 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

2 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

2 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

5 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago