आरोग्य

तुमच्या घरातल्या ‘या’ ६ वस्तूंमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका! अती वापर, मृत्यूला आमंत्रण

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हल्ली अनेक आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे, अशातच एक कर्करोग.

अनेकदा कॅन्सर हा आजार आनुवांशिक किंवा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होतो. जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार बळावू शकतो.

आपल्या अनेकांच्या घरात प्लास्टिक कंटेनर, बॉटल, डब्बे किंवा प्लास्टिकच्या इतर अनेक वस्तू पाहायला मिळतील. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जेवण गरम करुन त्यात ठेवल्याने प्लास्टिकमधील घटक विघटन होण्यास मदत होते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

रिफाइंड ऑइलचे अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढणे, कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच आरोग्याच्या इतर अनेक समस्या निर्माण होतात. तसेच या तेलातील रासायनिक प्रक्रियेमुळे आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात.

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे बॅक्टेरिया वाढून अन्न लवकर खराब होते. यामुळे अल्झायमर, कर्करोग आणि इतर न्यूरोलॉजिकल आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.

नॉनस्टिक कुकवेअरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. हे बनवताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे कर्करोग, थायरॉईड आणि यकृताचे विकार होऊ शकतात.

कॅन केलेल्या पदार्थामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जळजळ होणे, चक्कर येणे, अपचनाचा त्रास किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago