घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. इतकंच नाही तर अन्न व्यवस्थित चावून खाल्लं गेलं नाही तर वजनही वाढू शकतं.
घाईघाईने जेवण केल्यास वजन वाढत
अन्न नेहमी व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे. ही एक चांगली सवय आहे. पण अन्न घाईघाईने खाणं एक चुकीची सवय आहे. अन्न नेहमी शांतपणे चावून खावं. घाईघाईने खाल्ल्यास मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात शरीरात फॅट जमा होऊ लागतं. ही सवय वेळीच सोडली नाही तर तुम्ही लवकर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. अन्न व्यवस्थित हळुवार चावून खाणाऱ्यांच्या तुलनेत घाईघाईने खाणाऱ्यांना मेटाबॉलिज्म डिसऑर्डरचा धोका ४०० टक्के अधिक जास्त असतो.
घाईघाईने जेवण केल्यास कसं वाढतं वजन
जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू चावून खाता तेव्हा पोट मेंदुला संकेत देतो की, तुमचं पोट भरलेलं आहे. मात्र, घाईघाईने जेवण करत असाल तर तुम्ही ओव्हरईटिंग करता, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.
हळूहळू खाण्याची सवय कशी लावाल
अन्न हळूहळू चावण्याची सवय लावण्यासाठी जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं टाळावं. तसेच जेवण करण्यासाठी जास्त वेळ द्या. घाईघाईने जेवण करू नका. जेवण करताना तुमचं लक्ष केवळ जेवणावर असलं पाहिजे.
(सोशल मीडियावरून साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…