चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. दिल्लीच्या एक्सपर्टने झोपण्यापूर्वी आपण किती पाणी प्यावं हे सांगितलं आहे. यासोबतच, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील सांगितलं आहे.
रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ तास आधी हवं तितकं पाणी प्या. लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये. कारण असं केल्याने तुमच्या झोपेच्या चक्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकते.
ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. त्यांनी झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं देखील टाळावं. कारण जास्त पाणी प्यायल्यास त्याचा हृदयावर होणारा परिणाम गंभीर असू शकतो.
ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर असते, त्यांनी जर रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायलं तर पोटाशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात.
जे लोक रात्री जास्त पाणी पिऊन झोपतात. ते वारंवार वॉशरूमसाठी उठतात, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवरही दिसून येतो. त्यांना किडनीशी संबंधित अनेक समस्या असण्याचीही शक्यता असते.
जर तुम्ही थंडीच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायलात तर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…