आरोग्य

होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क

थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. परंतु तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपचारांची मदत घेऊ शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय.

होमिओपॅथी म्हणजे काय

होमिओपॅथी ही एक प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून औषधे तयार केली जातात. सर्दी, घसा खवखवणे, त्वचारोग यासह अनेक आजारांवर होमिओपॅथीच्या उपचारांचा वापर केला जातो. होमिओपॅथी उपचार नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवते. होमिओपॅथीद्वारे आपण कोणत्या मार्गांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी औषधांचा वापर करू शकता. होमिओपॅथी औषधांमुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. होमिओपॅथी औषधांमुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारखे संसर्गजण्य आजारांना धोका कमी होतो. त्यासोबतच तुम्हाला जर त्वचेसंबंधीत कोणत्याही समस्या अस्तील तर त्यावर सुद्धा होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहेत. परंतु नुसत्या औषधांमुळेच नाही तर तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील चांगल्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. दररोज सकाळी तुम्ही नियमित योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होत. त्यासोबतच शरीर देखील निरोगी रहाते. औषधांसोबत पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे असते. निरोगी शरीरासाठी ७ ते ८ तासांची झेप महत्त्वाची आहे. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. तुमच्या आहारामध्ये जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करू नका.

निरोगी आरोग्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

हिवाळ्यात, उबदार कपडे घाला, कोमट पाणी प्या आणि थंड पदार्थ टाळा.

तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, ड्राय फ्रूट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

हलका व्यायाम आणि योगासने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

14 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

14 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

18 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

18 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

18 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

19 तास ago