आरोग्य

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते, ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते.

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. व्हिटॅमिन्सची आणि मिनिरल्सच्या असंतुलनामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. असे अनेक व्हिटॅमिन्स आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते.

जास्त झोप का येते

व्हिटॅमिन डी

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतं तेव्हा झोपेचा त्रास होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते. जेव्हा व्हिटॅमिन डी कमी असतं तेव्हा शरीरात कॅल्शियम-फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे हाडांमध्ये वेदना होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळस जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील जास्त झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा व्हिटॅमिन बी १२ कमी असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप झोप येऊ लागते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला आळशी वाटतं. तुम्हाला दिवसभर झोप येते. म्हणून, व्हिटॅमिन बी १२ समृद्ध आहार घ्या. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ कमी असते.

केवळ व्हिटॅमिन डी आणि बी१२च नाही तर इतर अनेक पोषक घटक झोपेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न सारख्या मिनरल्सचा समावेश आहे. त्यांच्या कमतरतेमुळे शरीरात आळस, थकवा आणि अशक्तपणा येतो. यामुळे तुम्हाला दिवसभर झोप येते. जर तुम्हाला बराच काळ असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

12 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago