आरोग्य

डोळे चुरचूरतात सारखे डोळ्यातून पाणी येते, पाहा काय आहेत कारणे व उपाय

उन्हामुळे अनेक शारीरक समस्या उद्भवतात. काही फार कॉमन असतात. त्यामुळे त्यांची कारणे तसेच त्या समस्यांवर घरगुती उपाय आपल्याला माहिती असतात. मात्र अशाही काही समस्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात, ज्या काही ठराविक लोकांनाच होतात. त्या काही फार गंभीर नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते. उन्हाळ्यातच असे नाही इतरही वेळी अधून मधून असे पाणी डोळ्यातून येत असते. आपण म्हणतो माती गेली असेल किंवा झोप पूर्ण नाही झाली मात्र समस्या वेगळीही असू शकते.

१) आजकाल आपण दिवसभर लॅपटॉप समोर काम करतो. ८ ते ९ तास डोळ्यांसमोर मोबाइल किंवा लॅपटॉप नाही तर कम्प्यूटर असतोच. सतत स्क्रीन बघितल्यानेही डोळ्यातून पाणी येते. आता काम करण्याला इलाज नाही. काम तर करायलाच हवे. सगळीकडेच ऑफीसची कामे ऑनलाईन स्वरुपाची असतात. त्यामुळे यंत्रणा वापरणे आपल्याला भाग आहे. पण आपण काळजी तर नक्कीच घेऊ शकतो. डोळ्यांवर पाणी मारायचे. तसेच मधेमधे लहान ब्रेक घ्यायचे. उपकरणांचा वापर करताना वापरण्यासाठी खास चष्मा मिळतो. तो वापरा. झोपताना डोळ्यांना गुलाब पाणी लावा. थंड मलम लावा.

२) उन्हामुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळेही डोळ्यातून पाणी येते. सनग्लासेसचा वापर करा. सूर्य किरणांचा मारा कमी झाल्यावर पाणीही येणार नाही.तसेच टोपी वापरा.

३) जर कशाची ऍलर्जी झाली असेल तरी डोळ्यातून पाणी येते. जर पाणी यायचे थांबतच नसेल तर एकदा वैद्यांचा सल्ला घ्या. काही आजार किंवा ऍलर्जीचे लक्षण नाही ना याची खात्री करा.

४) झोपेचा अभाव असेल तरी डोळ्यातून पाणी येते. त्यामुळे योग्य झोप घ्या. डोळे चोळू नका.

५) जर तुम्ही मानसिक समस्येतून जात असाल तरी डोळ्यातून पाणी येते. काही जणांना पटकन व्यक्त होता येत नाही. मग साचलेले अश्रु वेगळ्या मार्गाने बाहेर येतात. मानसिक ताण असेल तर मानसोपचारतज्ज्ञाकडे जायलाच हवे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

19 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

21 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago