आरोग्य

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. परंतु, चालताना काही चुका झाल्या तर फायद्याऐवजी आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.

चुकीच्या पद्धतीने चालल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे चालताना या ८ चुका करणे टाळायला हवे. 

1) खूप वेगाने किंवा हळू चालणे

अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण खूप वेगाने चालतो किंवा अधिकतर वेळी आपण हळू चालतो. ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. अचानक वेगाने चालल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. चालण्यासाठी वेग ही योग्य असायला हवा. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

2) वॉर्म-अप आणि कूल-डाऊन न करणे

अचानक वॉर्म अप न करता जलद चालणे सुरु केल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. अचानक चालताना थांबल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे चालण्यापूर्वी आणि नंतर ५ ते १० मिनिटांनी स्ट्रेचिंग किंवा हळू चालावे.

3) चुकीच्या पद्धतीने चालणे

वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्याने श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यासाठी सरळ उभे राहून खांदे सैल ठेवून आणि हात हलवून चालत जा.

4) योग्य प्रमाणात पाणी न पिणे

डिहायड्रेशनमुळे रक्ताचा थर जाड होतो. ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते. उन्हाळ्यात वॉर्किंगला जाण्यापूर्वी किंवा नंतर पाणी प्या.

5) जड नाश्ता केल्यानंतर 

चालायला जाण्यापूर्वी जड किंवा तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. चालायला जाण्यापूर्वी हलका नाश्ता करा. फळे किंवा सुका मेवा सारखे पदार्थ खा.

6) प्रदूषण

धुळीने भरलेल्या किंवा जास्त प्रमाणात रहदारी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रदूषणांमुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. चालायला जाण्यासाठी गार्डनर किंवा हिरवागार ठिकाण शोधा.

7) अधिक श्रम करणे

जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीत दुखत असेल तर अशावेळी लगेच थांबा. जास्त चालण्यामुळे हृदयासाठी धोकादायक ठरु शकते. उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्यांनी काळजी घ्यावी.

8) नियमितता न राखणे 

अधूनमधून लांब चालत जाण्याऐवजी दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चाला. अनियमित चालण्यामुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

14 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

20 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

20 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

21 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

21 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

21 तास ago