आरोग्य

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही…

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करुन पाहतो. असे असले तरीही काहीजणांना दुपारची झोप ऑफिसमध्ये आवरताच येत नाही. जेवणानंतर काहीजणांना झोप येते, आळस आल्यासारखे वाटते, काम करू नये, थकवा वाढतो, चीडचीड होते. जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, दुपारच्या जेवणात दोन पदार्थ हमखास खाण्याचा सल्ला दिला आहे.
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून…
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून दुपारच्या जेवणात काय खाल्ल्याने आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात हे दोन पदार्थ समाविष्ट केले तर झोप न येता तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काम करायला उत्साह येईल.
कोणते आहेत ते दोन पदार्थ...
१) साजूक तूप: शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ आणि बी – १२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरुर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेश, बद्धकोष्टता यासारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरेल. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
२) चटणी: दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबऱ्याची, नारळाची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणांत खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा…
१) दिवसभरात पुरेशा प्रमाणांत पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
२) ऑफिसममध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.
३) दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट – तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.
४) गरजेपेक्षा जास्त जेवू नये. दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.
५) दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणांत खावा. जास्त खाणे टाळावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago