क्राईम

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जण ताब्यात

८४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील काचेआळी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८४,२६० रुपयांचा रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन्स व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ मे रोजी रात्री साडेसात वाजता करण्यात आली आहे.

फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. नरके (रांजणगाव पोलीस स्टेशन, प्रतिनियुक्ती – उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारेगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरमधील काचेआळी येथील अंबिका निवास येथे काहीजण बेकायदेशीरपणे तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

शिरूर पोलिसांनी या प्रकरणी १) अनिल मधुकर तांबे (वय ४०) २) प्रदीप श्रीकृष्ण तिवारी (वय ४२) ३) किसन विठ्ठल जामदार (वय ६४), ४) संजय केवलचंद भटेवरा (वय ६५) ५. गणेश जयसिंग मल्लाव (वय ३६) ६) श्रीकांत दशरथ मल्लाव (वय ३४) ७) सुनीता मधुकर धाडीवाल – यांनी जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ठिकाणाहून ६३,२६०/- रुपयांची रोख रक्कम, 6 मोबाईल फोन्स (सॅमसंग, ओपो, रिअलमी, एमआय, व्हीवो),११ पत्यांचे कॅट (१० सिलबंद व १ वापरलेला)एकूण किंमत: ₹८४,२६०/- आदी रक्कम व वस्तु ताब्यात घेतल्या आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरासह ग्रामीण भागात जुगार खुलेआम मोठ्या प्रमाणावर खेळला जात आहे. पोलिस उपविभागीय कार्यालयामार्फत ही धाडसी कारवाई करण्यात आली असून अश्याच प्रकारे गावठी दारू विक्री, गुटखा विक्री, जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago