आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत तसेच विरोधक काहीच करु शकणार नाहीत. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. पचनक्रिया आणि डोळे यांचे आजार डोके वर काढतील तसेच खर्चात वाढ होईल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ राहा मानसिक समाधान मिळेल.

वृषभ: आजचा दिवस कुटुंबीयांना चांगला वेळ देणार आहात. शुभ समाचार मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तब्येतीची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. आर्थिक बाबतीत फायदा आणि व्यवसायात नफा आहे. मिळकतीचे मार्ग खुले झालेले आहेत त्याचा लाभा घ्या. रात्री मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

मिथुन: कुलदेवतेच्या आशीर्वादाने एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. कामे जास्त आहेत त्याच बरोबर अनावश्यक खर्च वाढतायेत त्याकडे लक्ष द्या. वाहन चालताना वेगावर नियंत्रण ठेवा. प्रियजनांच्या भेटीमुळे मनोबल वाढेल. सगळेजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारात नफा वाढल्याने बँक बॅलन्स उत्तम असेल.

कर्क: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढल्यामुळे मानसिक समाधान मिळेल आणि कामातील उत्साह वाढेल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. निर्णय घेताना भावनांवर कंट्रोल ठेवा आणि घाई करु नका. काम करताना प्रत्येक बाबतीत सावध राहा. संयम आणि शांतपणे काम करा. तुमच्या हुशारीने आणि कार्यकुशलतेने समस्यांवर समाधान मिळवू शकाल.

सिंह: आजचा दिवस परोपकारात जाणार आहे. दुसऱ्यांना मदत केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कामात काही बदल होतील पण ते तुमच्या बाजूने असतीस. सहकाऱ्यांचा मूड खराब असेल त्याबद्दल सतर्क राहा. तुमच्या चांगल्या वागण्याने कामे मार्गी लागतील. रात्री भावाची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची फार धावपळ होईल, सतर्क राहा.

कन्या: ज्येष्ठांची सेवा आणि पुण्य कार्यावर खर्च होणार, यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रतिस्पर्धी डोकदुखी वाढवतील. वादविवादापासून दूर राहा. व्यापारात अचानक नफा झाल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकेल. तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीमधील पुढील रणनीती कोणाबरोबर शेअर करू नका.

तुळ: आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा ठिक नाही. खूप कष्ट करूनही उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत आहे. तुमची चिडचिड वाढलेली असेल. गुप्त शत्रू सक्रिय राहतील, निरर्थक धावपळ होईल त्यामुळे आज काम करताना सतर्क राहा. कुटुंबात आज नाराजीचे सुर असतील. संध्याकाळपर्यंत सगळे वातावरण ठिक होईल, तुम्ही काळजी करु नका.

वृश्चिक: आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. कोणताही महत्त्वाचा व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होईल आणि तुम्हाला एक मोठे प्रोजेक्ट मिळेल. आज तुम्ही तुमचे बोलणे इतरांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालात, तर कामे पटापट मार्गी लागतील आणि वरिष्ठ अधिकारी तुमचे भरभरून कौतुक करतील..

धनु: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असून धनलाभाचा योग आहे. तुम्ही खूप दिवसांपासून काही कामे करत होतात ती पूर्ण होतील. घरात धनधान्य वाढेल तसेच मित्रांना जर पैसे उधार दिले असतील तर ते मिळतील. मंगलकार्यात खर्च होणार आहे. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. रात्री एखाद्या मंगलकार्यात खर्च करणार आहात.

मकर: तुमच्यासाठी दिवस उत्तम असून तुम्ही जे काही काम हातात घेणार आहात ते पार पाडणार आहात. आज काही आदरणीय व्यक्तीमत्वासोबत भेटी होतील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. काही उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे मालमत्तेच्या संदर्भातील वादावर तोडगा निघेल, तब्येतीची काळजी घ्या आणि राग राग करु नका यामुळे काहीही साध्य होणार नाही. तुम्ही शांत डोक्याने सगळी कामे करा, तुम्हाला नक्की यश मिळेल.

कुंभ: तुमच्यासाठी दिवस चांगला असून तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे पेमेंट रखडलेले असेल तर ते मिळणार आहे. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने प्रगतीच्या विशेष संधी प्राप्त होतील. भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा.

मीन: तुमच्यासाठी दिवस उत्तम आहे. धनलाभाचे योग असून आज जे काही काम करणार आहात त्यात उत्तम यश मिळेल. आज दिवसभर उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत त्याचा लाभ घ्या. विरोधकांचा पराभव होईल आणि त्यांचा त्रास देखील कमी होईल. नशिबाचे तारे पुन्हा चमकणार आहेत. व्यवसायात जास्त धन गुंतवणे लाभदायक असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

13 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

19 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

19 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago