आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून अचानक धनलाभाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार असून त्याचा लाभ घ्या. सरकारी डिल, वडिलोपार्जित व्यवसाय किंवा शेअर-गुंतवणुकीद्वारे नफा शक्य आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रमोशन तसेच नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काही घटना अशा घडतील त्यामुळे चिडचिड वाढेल पण तुम्ही शांत राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा

वृषभ: आजचा दिवस चांगला असून मालमत्तेत वाढ होईल. घरात सुख-शांती आणि समाधानाचे वातावरण असेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे धनलाभाची शक्यता आहे पण अनावश्यक खर्च टाळा. नोकरीत बदली होऊन प्रगतीची संधी मिळेल, तुम्ही या संधीचा लाभ घ्या. जे लोक फ्रिलान्स करत आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळेल त्यात चांगला फायदा होईल. सरकारी कर्मचारी किंवा प्रशासकीय सेवांशी संबंधित लोकांचा मानसन्मान वाढेल.

मिथुन: नोकरीत प्रमोशनचे योग आहेत पण त्याबरोबर जबाबदारी देखील वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्यामुळे मन समाधानी होईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून तुमचे राहणीमान चांगले होणार आहे. कुटुंबासाठी खास खरेदी करणार आहात. नोकरी असो वा व्यवसाय भागीदार तसेच सहकारी यांचा पाठिंबा असेल. करिअरमध्ये नवीन योजना राबवण्याची वेळ आली आहे. शत्रू किंवा विरोधक सक्रिय असतील पण तुमच्या कार्यक्षम रणनीतीमुळे त्यांचा पराभव होईल.

कर्क: प्रवासाचा योग असून त्यात लाभ आहे. काही अडचणी येतील पण मित्रांच्या मदतीमुळे कामे पटापट मार्गी लागणार आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून प्रत्येक कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून, हरवलेली वस्तू किंवा जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. राजकीय किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील.

सिंह: आजचा दिवस ठिक आहे. लवकरच घरात मंगलकार्याचे आयोजन होणार आहे त्यामुळे आर्थिक व्यवस्था करावी लागेल. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायात नवे मार्ग मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल, अचानक पैसा हातात येईल ज्यामुळे आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. गुंतवणूकदारांना चांगले परतावे मिळू शकतात. तुम्हाला नोकरीत तुमची कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळेल, जी तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल. सर्व काही चांगले होत असताना तब्येतीची काळजी घ्या.

कन्या: नोकरी असो वा व्यवसाय मेहनत जास्त करावी लागेल. व्यवसायातील उत्पन्न वाढत असल्यामुळे तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याचा भविष्यात फायदा होईल. कन्या राशीचे जे जातक लेखन किंवा क्रिएटीव्ह काम करत आहेत त्यांना मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी वादविवादात पडू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुक करताना तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. नोकरीत सकारात्मक बदल शक्य आहेत. संध्याकाळचा वेळ जुन्या मित्रांच्या भेटीमुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते.

तूळ: तुमच्या इच्छेविरुद्ध काही काम मिळू शकते, ज्यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल. याचा राग घरात काढू नका. जे काही करत आहात त्यात समाधान मानायला शिका. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात, याबाबत धीर धरणे तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य रणनीतीशिवाय कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा करिअर बदल तुमच्यासाठी घातक ठरेल हे लक्षात ठेवा.

वृश्चिक: आजचा दिवस चांगला असून खूप दिवसांपासून थांबलेले पेमेंट तुम्हाला मिळेल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे व्यवसायात बदल करा त्याचा लाभ भविष्यात मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे आणि हुशारीचे कौतुक होईल, परंतु सहकाऱ्यांपासून सावध राहा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन ऑफर मिळू शकतात. तुमच्या योजना तुम्हाला मोठा नफा देणार आहेत. दरम्यान सखोल विचार करून निर्णय घ्या.

धनु: आज खूप सतर्क रहायला हवे. घरात संपत्तीवरून वाद होऊ शकतात. भावंडांत वैचारिक मतभेद वाढतील तुम्ही संयमाने परिस्थिती हाताळायला हवी. व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग आहे. प्रवासात सतर्क राहा. तुम्ही शिक्षण, अध्यापन आणि सल्लामसलत या संदर्भात तुम्ही काम करत असाल तर फायदा आहे. आर्थिक स्थिती स्थिर असून जुने कर्ज फेडू शकाल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा विचार करावा. नवीन संधी हाती घ्यावी मग एखादी गोष्ट सोडावी ते चांगले असेल.

मकर: आजचा दिवस उत्तम असून मान-सन्मान वाढेल. तुम्हाला अचानक वडिलोपार्जीत धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे. तुमची कामाची रणनीती पाहून ऑफिसमध्ये विरोधक काहीच करू शकणार नाहीत. आज तुम्ही जे काम हाती घेणार त्यात यश मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदा किंवा डिल निश्चित झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. शेअर बाजारात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. करिअरमध्ये रिलोकशनचा विचार तुम्ही करणार आहात. परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल.

कुंभ: नोकरीत तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला कठोर मेहनत करून प्रोजेक्ट पूर्ण करावे लागेल. आज तुम्ही धार्मिक कामात व्यस्त राहणार आहात. मालमत्तेचा व्यवहार यशस्वी होणार असून त्यात चांगला नफा होईल. आज काही कारणामुळे खूप राग येईल पण संयम ठेवा. जोडीदारासोबत मतभेद होवू देवू नका. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्पष्ट चर्चा करावी लागू शकते. घर किंवा ऑफिसच्या दुरुस्तीवर खर्च होण्याची शक्यता आहे.

मीन: आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती यावर खर्च वाढणार आहे. मीन राशीचे जे जातक राजकारणात आहेत त्यांना संपर्काचा फायदा होईल तसेच वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदारी देतील. मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ उत्तम आहे, लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा कारण लग्न किंवा धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित मोठा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सुख समाधानाचे असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago