मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे.
गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार संपणार आहेत कारण..
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सभासार प्रणालीमुळे
सरपंच वा ग्रामसेवक निधीचा गैरवापर करू शकणार नाहीत.
ग्रामसभा न घेता विकास अडकवू शकणार नाहीत.
प्रत्येक निर्णयाची नोंद व तपासणी थेट केंद्राकडून होणार
AI ची करडी नजर
बैठकींचे रेकॉर्डिंग
निर्णयांची नोंद
डेटा विश्लेषण
निधीचा योग्य वापर झाला का यावर लक्ष
देशातील तब्बल 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली लागू होणार असून ज्या राज्यांत ग्रामपंचायती जास्त आहेत तिथूनच याची सुरुवात होणार
सभासार प्रणालीचे फायदे
पारदर्शक प्रशासन
लोकाभिमुख निर्णय
निधीचा योग्य वापर
नागरिकांची होणारी होरपळ थांबणार
पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने ही प्रणाली देशभर लागू होणार असून आता सरपंच वा ग्रामसेवकांची मनमानी थांबणार गाव विकासाच्या नव्या युगात प्रवेश करणार
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…