आरोग्य

पचन व्यवस्थित होण्यासाठी

अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया. चेरी, द्राक्ष, बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. दररोज दुपारी एक वाटी दही प्या. दह्यात प्रोबायोटिक्स असतात. ते पचनव्यवस्था सुधारतात. ज्या लोकांना मांसाहार जास्त आवडतो अशा लोकांनी कमी चरबी असलेले मांस खायला हवे. कारण मांस पचायला वेळ लागतो.

आलं, काळे मिरे, सैंधव मीठ आणि धणे या मसाल्यांचा जेवणात समावेश असायला हवा. हे मसाले जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर पचनकार्य सुधारतात. व्हिटॅमिन-सी असलेले ब्रोकोली, टोमॅटो, किवी फळ, स्ट्रॉबेरी हे खावेत. रंगीत फळं, भाज्या भरपूर साऱ्या खाव्यात त्याने पोट साफ होते आणि अपचनाचा त्रास होत नाही.

सकाळी उठल्यावर व्यायाम आणि पोटाला मालीश केल्यास पचनशक्ती वाढते. काही चांगल्या तेलांनी पोटाची मालीश करावी. सकाळी गरम पाणी प्यायला आवडत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा, पोटातले ऑसिड कमी होऊन पोट साफ राहील. भूकेपेक्षा थोडे कमी खावे, त्यामुळे पचन व्यवस्थितपणे व्हायला मदतच होईल.

तुम्ही कोणत्या प्रकारे खाता, कशा प्रकारे खाता यावरही पचन कार्य अवलंबून असते. जेवायला मांडी घालून म्हणजे सुखासनात बसावे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे, प्रत्येक घासाचा ज्युस बनवून पिला पाहिजे. शांतपणे, समाधानाने, जेवणाचा आनंद घेत जेवले पाहिजे. जेवताना टीव्ही, मोबाईल पाहू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago