आरोग्य

आजीबाईचा बटवा आम्ल पित्त आणि काही उपाय

1) केळी: केळी खाल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते व त्यातील ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ होऊन पित्त कमी होते. म्हणून किमान एखादे पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताचा त्रासा पासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक दघटक म्हणून कार्य करतो व त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होते.

2) दूध: कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबून अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपवते. म्हणून पित्त असलेल्यांनी थंड दूध प्यायल्यास पित्तामुळे पोटात व छातीत होणारी जळजळ कमी होते. मात्र हे थंड दूध साखर वा इतर काहीच न मिसळता प्यावे.

3) बडीशेप: चमचाभर साजूक तूप घातल बडीशेपमधील ऍन्टीअल्सर हा घटक पचन सुधारतो व बद्धकोष्ठता दूर करतो. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. म्हणून दर दोन तासाने 1 लहान चमचा बडीसौफ दाणे खाल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. ज्यांना नेहमी पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

4) जिरे: ज्यांना पित्ताचा त्रास होत असल्यास त्यांनी सकाळ संध्याकाळ एक वाटी पाण्यास 1 मोठा चमचा जिरे टाकून ते उकळावे व 1/2 वाटी झाल्यावर तो काढा कोमट असतांनाच प्यावा. किंवा सकाळ -दुपार-संध्याकाळ 1 लहान चमचा जिरे चावून त्याची लाळ गिळावी त्या मुळे पचन क्रिया सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात.

5) लवंग: लवंग चावून लाळ गिळावी. त्यामुळे पचन क्रिया सुधारून पित्त दूर दूर होते तसेच पोटफुगी व गॅसचे विकारही दूर होतात. पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडातच राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

6) वेलची: दररोज 2 तरी वेलची खाल्याने शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्यास मदत होऊन पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.

7) पुदिना: पुदिन्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ थांबते. पित्त असलेल्यांनी पुदिन्याची पाने कापून पाण्यासोबत उकळून घ्यायची. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’मुळे पचायला जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी आणि सर्दी पासून सुटका होते.

8) अद्रक: अद्रक रस पिल्याने पचन क्रिया सुधारते. पोटातील अल्सर चा त्रास कमी होण्यास मदत होते. अद्रक मधील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून चघळत राहा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago