आरोग्य

क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे

आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर असंख्य टिप्स, आणि उपाय सापडतात. मात्र, बऱ्याचदा या लेखांचे मथळे इतके आकर्षक आणि आश्वासक असतात की, आपल्याला ते वाचल्याशिवाय राहवत नाही. हेच क्लिकबेट मथळे आहेत. हे मथळे वाचकांना क्लिक करण्यासाठी भुरळ घालतात, पण त्यात बहुतेक वेळा तितकासा महत्त्वाचा किंवा खरा मजकूर नसतो.

क्लिकबेट म्हणजे ऑनलाइन वापरकर्त्यांना एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरली जाणारी एक युक्ती आहे. यात असे शीर्षक, प्रतिमा किंवा मजकूर वापरले जातात जे खूपच आकर्षक, गूढ किंवा भावनिक असतात. क्लिकबेटचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त क्लिक मिळविणे आणि वेबसाइटवर येणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे हा असतो पण बऱ्याचदा क्लिकबेटमध्ये दिलेली माहिती अतिशयोक्तीपूर्ण, दिशाभूल करणारी किंवा अगदी खोटीदेखील असू शकते.

आरोग्यविषयक क्लिकबेट मथळ्यांची उदाहरणे

हा एकच उपाय तुम्हाला सात दिवसांत

वजन कमी करायला मदत करेल.

फक्त एक पदार्थ खा आणि

तुमची त्वचा तेजस्वी बनेल.

कॅन्सरपासून शस्त्रक्रियेशिवाय मुक्ती

अशा मथळ्यांमधून वाचकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, पण लेख उघडल्यानंतर दिसते की त्यातील गोष्टी प्रभावी किंवा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाहीत.

क्लिकबेटचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक प्रकाराचे रोग्यांवर विशिष्ट परिणाम होतात. येथे मुख्य प्रकारांचे आणि त्यांचे संभाव्य परिणाम तपशीलवार वर्णन दिले आहे

1) चमत्कारिक उपाय-उदाहरण: ही एकच औषधी वनस्पती कॅन्सर बरा करू शकते किंवा हे रोज सकाळी प्या आणि वजन त्वरित कमी करा.या प्रकारचे मथळे चमत्कारिक उपायांचे आश्वासन देतात, गंभीर आरोग्य समस्यांसाठी त्वरित आणि सोपे उपाय देतात. हे मुख्यतः त्वरित समाधान शोधणाऱ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी असतात. त्याचा रोग्यांवर घातक परिणाम होतो, खोट्या अपेक्षा निर्माण होतात.

2) भीती निर्माण करणारे क्लिकबेट उदाहरण: सकाळच्या कॉफीमुळे तुम्हाला धोका आहे का? किंवा या पदार्थांमुळे तुम्हाला हळूहळू विषबाधा होते आहे, असे मथळे भीती आणि चिंता निर्माण करतात, ज्यामुळे लोकांना आपल्या दैनंदिन सवयींविषयी असुरक्षित वाटू लागते.

3) अतिसाधारण उपाय-उदाहरण: रात्री झोपण्यापूर्वी हे करावे म्हणजे तुम्ही जास्त तरुण व्हाल किंवा १० सेकंदांत निद्रानाशावर उपाय, हे लेख समस्यांवर अतिसोपे उपाय सुचवतात, ज्यामुळे मोठे परिणाम अल्प प्रयत्नात साध्य होतील असे दर्शविले जाते. रोग्यांवर विपरीत परिणाम होऊन चुकीची अपेक्षा निर्माण होते. समग्र उपचारांचा अभाव यात अभाव असतो.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

क्लिकबेट मथळ्यांमुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

उदाहरणार्थ

1) गैरसमज आणि चुकीची माहिती पसरते

2) आरोग्यविषयक सल्ल्याचा गैरवापर: बहुतांश क्लिकबेट लेख हे वास्तविक तज्ज्ञांनी लिहिलेले नसतात

3) भावनिक अस्थैर्य निर्माण होऊ शकते: क्लिकबेटमध्ये दिलेली माहिती बऱ्याचदा खोटी किंवा अतिशयोक्तीपूर्ण असते, ज्यामुळे वापरकर्त्यांना निराशा होते.

4) पैसे वाया जातात: काहीवेळा अशा लेखांमध्ये उत्पादनांची जाहिरात असते, ज्यामुळे लोक अवास्तव किमतीचे आणि अनावश्यक पदार्थ खरेदी करतात.

5) वेळेचा अपव्यय: लोकांचा अमूल्य वेळ या प्रकारच्या क्लिकबेटांमुळे वाया जात असतो.

क्लिकबेटपासून कसे वाचावे

1) शीर्षक काळजीपूर्वक वाचा: शीर्षक खूपच आकर्षक किंवा भावनिक वाटत असेल तर सावधगिरी बाळगा.

2) स्रोताची पडताळणी करा: माहिती विश्वासार्ह स्रोताकडून आली आहे का ते तपासा.

३) कमेंट्स वाचा: इतर वापरकर्त्यांनी लिहिलेल्या कमेंट्स वाचून तुम्हाला माहितीची सत्यता तपासण्यास मदत होऊ शकते.क्लिकबेटपासून सावध राहून आणि विश्वसनीय स्रोतांकडून माहिती मिळवून तुम्ही ऑनलाइन सुरक्षित राहू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago