आरोग्य

जास्वंदीचे आरोग्यासाठी फायदे

जास्वंदाचे फुल दिसयला जेवढे सुंदर असते तेवढेच फायदेशीर असते. सुंदरता वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी याचा अनेक वर्षांपासुन वापर केला जात आहे. अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि ब्यूटी ट्रीटमेंटसाठी जास्वंदाच्या फुलाचा उपयोग केला जातो. स्ट्रेस आणि पॉल्युशन मुळे केस गळण्याची समस्य असो कींवा पिंपल्सची, या दोन्हीसाठी हे फुल फायदेशीर आहे.

केस गळण्याची समस्या: केस गळण्याच्या समस्येपासुन प्रत्येक जण त्रस्त आहे. जास्वंदाचे फुल ही समस्या दुर करण्यासाठी खुप फादेशीर आहे. हे फक्त केस गळणे थांबवत नाही तर यामुळे केसांना वेगळीच चमक येते. जास्वंदाची ६-८ फुले बारीक करुन घ्या. हे डोके आणि केसांच्या मुळाला चांगल्या प्रकारे लावा. ३ तास ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. केसांच्या मुळाला पोषण दिल्याने केसांच्या वाढीसाठी फायदा होतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावला असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.

केसगळती घरगुती उपाय: फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन-सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो. जास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत. जास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात. जास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन-सी मुळे केसांची घट्ट होतात.

घरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक

जास्वंद आणि खोबरेल तेल कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.

जास्वंद आणि ऑलिव तेल: जास्वंदाचा वापर रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा. शाम्पू तयार होईल. खलबत्यात २-३ जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण १५-२० मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.

जास्वंद आणि आवळा: जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्या नंतर ते धुऊन टाका. ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.

एनीमिया कमी करते: आयरनच्या कमतरतेमुळे एनीमियाची समस्या होते. यासाठी अनेक वेळा टॅबलेट, सिरप आणि इन्जेक्शनचे साहाय्य घेतले जाते. मात्र जास्वंदाच्या फुलाने एनीमियाचा इलाज करता येतो. ४०-५० जास्वंदाच्या कळ्यांना बारीक करुन एका एयर टाइट डब्ब्यात ठेवा. रोज सकाळ संध्याकाळी एक कप दूधासोबत हे घ्या. फक्त एका महीन्यात एनीमियाची समस्या दुर होईल, सोबतच स्टॅमिना वाढेल.

मेमरी पावर वाढते: वाढत्या वयासोबतच मेमोरी लॉस होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु जर कमी वयातच स्मरणशक्ती कमी होत असेल तर काळजी करण्याचे कारण आहे. जास्वंद ही समस्या दुर करण्यात मदत करते. जास्वंदाची १० पाने आणि १० फूल घ्या. हे वाळवुन आणि त्याची पावडर बनवा. हे एयर टाइट डब्ब्यात ठेवा. दिवसातुन दोन वेळा हे दुधासोबत घ्या.

सूज कमी करते: जास्वंदाचे फूल खाज, जळजळ आणि सूजची समस्या दूर करते. जास्वंदाचे फूल आणि पान बारीक करा. सूजलेल्या आणि आग होणाऱ्या भागावर लावा. काही मिनिटातच समस्या दूर होईल.

पिंपल्स: पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर, जास्वंदाच्या पानांना पाण्यासोबत उकळुन बारीक करा आणि यात मध मिळवुन पिंपल्सवर लावा. जास्वंदाच्या फुलामध्ये अँटी-ऑक्सिडंट असते, जे कॉलेस्ट्रॉल कमी करण्या सोबतच ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. यासाठी जास्वंदाची फुले गरम पाण्याच उकळुन ते पाणी पिणे फायदेशीर असते. हर्बल चहा सारखा याचा वापर केला जाऊ शकतो.

जास्वंदीचे तेल कसे तयार करायचे

जास्वंदीचे तेल शीतल गुणधर्माचे असून ते साधारण चिकट आणि बुळबुळीत भासते. केस काळे करण्यासाठी, मऊ करण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी तर त्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो. जास्वंदीची पाच पाकळ्यांची साधी फुले असतील तर १०० फुले आणि भरगच्च लाल जास्वंद असेल तर २५ फुले. ओल्या माक्याचा रस २५० मिली. वाळवलेले आवळे १० नग. वडाच्या कोवळ्या पारंब्याची टोके साधारण एक वाटी. खोबरेल तेल ५०० ग्राम.

कृती

प्रथम आवळे कुटून भरड करून घ्यावेत ते २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत (हेच पाणी आवळ्या सहित वापरावे फेकून देऊ नये).

जास्वंदीच्या पाकळ्या बारीक कुस्करून घ्याव्यात.

वडाच्या पारंब्या पण ठेचून बारीक कराव्यात.

सर्व मिश्रण एकत्र करावे. नंतर या मिश्रणात माक्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळून मिश्रण लोखंडी कढई मध्ये शिजवायला ठेवावे.

थोड्या वेळाने मिश्रण उकळू लागते तेव्हा अधून मधून ढवळत राहावे.

बराच वेळ उष्णता दिल्यावर जास्वंदाच्या पाकळ्यांचा रंग मिश्रणात उतरू लागतो आणि त्या रंगहीन होतात.

मिश्रणाला चांगला रंग येत राहतो आणि पाणी उडून जाऊन तेल शिल्लक राहू लागते.

तेलात थोडेच पाणी शिल्लक आहे हे लक्षात आल्यावर मिश्रण उतरून व्यवस्थित गाळून घ्यावे आणि परत चुलीवर ठेवावे.

नंतर मात्र फार काळजी घ्यावी लागते. अग्नी मंद ठेवावा लागतो. मिश्रणात कापसाची वात बुडवून ती आगीवर धरावी. तडतड करत जळाली तर पाणी शिल्लक आहे असे समजावे. वात निर्वेध जळाली कि तेल तयार झाले असे समजावे. मात्र तेल जळू देऊ नये .

तेलाला मंद सुगंध येतो. चिकट, बुळबुळीत आणि रंगाने गडद असे जास्वंद तेल केसांसाठी अमृत आहे आणि बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही तेलापेक्षा याचा गुण उत्तम येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

11 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

11 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

11 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

21 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

21 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

21 तास ago