आरोग्य

शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे. ज्याचं वैद्यकिय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. हे खायला जितकं स्वादीष्ट असते तितकंच याचे फायदेही मिळतात.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे 

मोरिंगा शरीराच्या अनेक पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. यात एंटी इंफ्लेमेटरी, एंटी डायबिटीक, एंटी बायोटिक, एंटी ऑक्सिडेंट, एंटी व्हायरल, एंटी एजिंग आणि एंटी फंगल गुण असतात. याव्यतिरिक्त यात व्हिटामीन ए आणि सी असते. एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुणांनी परीपूर्ण शेवग्याचे सेवन केल्यानं तुमचे ब्रेन सेल्स हेल्दी राहण्यास मदत होते. याचे सेवन केल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. शेवग्याच्या शेंगांमध्ये ट्रिप्टोफेन नावाचे प्रोटीन असते ज्यामुळे तुमचा मेंदू चांगला राहतो.

शेवग्याच्या शेंगांना तुम्ही आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. यातील एंटी ऑक्सिडेंट्स तत्व त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. वाढत्या वयात तुमची त्वचा लटकते. याच्या बचावासाठी शेवग्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे त्वचेत बदल दिसून येतो याशिवाय फाईन लाईन्स, सुरकुत्या येत नाहीत.

शेवग्याच्या शेंगांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी तत्व असतात ज्यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. एक्जिमा, सोरायसिस यांसारख्या त्रासांवरही आराम मिळतो. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यानं शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, याव्यतिरिक्त गुड कोलेस्टेरॉल वाढते ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवगा एंटी डायबिटीक गुणांनी परिपूर्ण असते ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोट आणि हाडांसाठी गुणकारी

जर तुम्हाला पोटाशी संबंधित गॅस, अपचन यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करू शकता. यातील फायबर्सयुक्त गुण पोट हेल्दी ठेवतात. ज्यामुळे मलत्याग करणंही सोपं जातं. कॅल्शियम, व्हिटामीन्सनी परिपूर्ण शेवग्याचे सेवन केल्यानं बोन्स डेंसिटी वाढते.

इम्यूनिटी वाढते

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर शरीरातील इम्यूनिटी वाढवायला हवी. यात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुण असतात ज्यामुळे शरीराच्या रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत होते. शेवग्याच्या भाजीचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. या पानांची पावडर बनवून कोमट पाण्यासोबत घ्या. याचा ज्यूस आणि सूपचा आहारात समावेश करा. काही लोक शेवग्याच्या पानांचा काढा बनवूनही पितात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago